नाशिक| कोरोना संकट काळातून छोटे व्यवसाय, उद्योग सावरण्यासाठी दिवाळीत ऑनलाइन वस्तू खरेदी न करता छोट्या व्यावसायिकांकडून वस्तू, साहित्य खरेदी करण्याचे आवाहन कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेंडर्स महाराष्ट्र राज्य समितीचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी केले आहे.
लॉकडाउनच्या काळात सर्व स्थानिक व्यापारी वर्गाने मदत केली बऱ्याच ठिकाणी गोगरिबांसाठी मोफत रेशन दिले. गरजूंना मदतीचा हात दिला. आता भारतीय बाजारपेठेत व्यापार सुरळीत सुरू झाला आहे, त्यादृष्टीने ऑल इंडिया व्यापारी कन्फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्य (CAIT) यांनी सर्व भारतीय जनतेला आवाहन केले आहे, की आपण सर्वांनी राज्य आणि देश तसेच सर्व व्यवसायिकांच्या हितासाठी आपल्या गावातील दुकानातच खरेदी करावी. मग ते मोबाईल असो की भाजीपाला,कृपया ऑनलाईन खरेदी टाळा व देशातील रुपया मजबूत करून देशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यास हातभार लावण्याचे गरज असल्याचे थोरात यांनी सांगून, आपल्या अडचणीच्या काळात आपल्या शहरातील छोटा व्यापारीच मदतीला येईल ऑनलाईनवाले नाही असे ही म्हणाले.