- केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचे निधन - TheAnchor

Breaking

October 8, 2020

केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचे निधन

नवी दिल्ली| लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (७४) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीत  उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सध्या केंद्र सरकारमध्ये ते ग्राहक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत होते. ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची एक्झिट बिहारसाठी दुःखद घटना आहे. दलित, शोषितांना न्याय देण्यासाठी ते कायम प्रयत्नशिल राहिले. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आणि देश संयमी आणि अनुभवी नेत्याला कायमचा मुकला अशी भावना जन सामन्यांमध्ये होती. जनतेसाठी कायम  झिंझणाऱ्या नेत्याला भावपूर्ण श्रध्दांजली! नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी ही रामविलास पासवान यांच्या निधनाची बातमी समजताच शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे