उस्मानाबाद| नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळे नुसता विचार नाही पण प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहोत. दोन तीन दिवसांत यावर आपणास कळेल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. उस्मानाबाद येथील पत्रकार परिषद बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी बोललो आहे,त्यांना भेटलो आहे. जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ते करणार आहोत.नुकसान मोठे आहे, मी इथे दौरा करतो आहे आणि तिकडे मंत्रालयात मदत कशी आणि कधी करायची त्यासंदर्भात कामही सुरु झालेआहे.
पंचनामे जवळपास झाले आहेत. त्यामुळे नुसता विचार नाही पण प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा ते आम्ही पाहतो आहोत. दोन तीन दिवसांत यावर आपणास कळेल. विमा कंपन्यांशी देखील बोलून घेत आहोत
केंद्राकडून जीएसटीची थकबाकी देखील येणे बाकी आहे, तो परतावाही लवकर मिळणे गरजेचे आहे. सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही.