- मुंबई प्रदेश काँगेस अध्यक्षपदी आ. भाई जगताप - TheAnchor

Breaking

December 19, 2020

मुंबई प्रदेश काँगेस अध्यक्षपदी आ. भाई जगताप

मुंबई| मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आ. भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरण सिंग सप्रा यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई काँग्रेसमधील गटबाजी बघता कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
As-the-President-of-Mumbai-Pradesh-Congress-Bhai-Jagtap-national-congress-kamiti

अखेर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नियुक्ती जाहीर केली आहे. भाई जगताप यांचा संयमी स्वभाव आणि पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी असलेला समन्वय यामुळे पक्षाने त्यांची निवड केल्याचे बोललं जात आहे.

तसेच प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नसीम खान, समन्वय समितीच्या अध्यक्षपदी अमरजिंत सिंग मनहास, जाहीरनामा व प्रकाशन समितीच्या अध्यक्षपदी सुरेश शेट्टी, प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने मुंबई कॉंग्रेसचे प्रभारी म्हणून चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.