- कांदा आयातीवरील अटी शिथिल; कांदा@१९ लासलगावला घसरण सुरूच - TheAnchor

Breaking

December 18, 2020

कांदा आयातीवरील अटी शिथिल; कांदा@१९ लासलगावला घसरण सुरूच

नाशिक|कांद्याच्या आयातीवरील अटी आणखी शिथिल केल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काद्यांच्या दरातील घसरण सुरू आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा ७०० ते १५५१ तर लाल कांदा १००० ते १९५० रु. प्रति क्वि.पर्यंत इतका घसरला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कांद्याची घसरण सुरू आहे, अशात निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असतांनाही आयातीच्या अटी आणखी शिथिल होत असल्याने कांदा दरातील घसरण सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

Conditions-on-onion-imports-relaxed-Onion@19-rs-Lasalgaon-continues-to-decline
फोटो: फाईल

कांद्याच्या चढ्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राच्या उपाययोजना सुरूच आहे, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने कांद्याच्या आयातीसाठी फ्युमिगेशनची अट आणि प्लान्ट क्वारंटाईन(पीक्यू) आदेश २००३ नुसार फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रासंदर्भात अतिरिक्त हमी अटींमधील शिथिलीकरण  ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिथिलीकरण विशिष्ट स्थितीनुसार असेल. असेेेे स्पष्ट केले आहे.