नवी दिल्ली| भारतात कोविड महामारीचा वृद्धीदर 2 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे आणि मृत्यूदरही जगात जवळपास सर्वात कमी, म्हणजे 1.45 टक्के इतका आहे. दररोज सरासरी दहा लाख चाचण्या करण्याच्या धोरणामुळे रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर देखील 6.25 टक्यांपर्यंत कमी झाला आहे, असे केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली, कोविड-19 साठी स्थापन मंत्रिगटाची 22 वी बैठक आज नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.बैठकीच्या सुरुवातीला डॉ हर्षवर्धन यांनी गेले अनेक महिने अविश्रांत आपले कर्तव्य करत असलेल्या सर्व कोरोनयोद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. देशातील सार्वजनिक आरोग्य सेवेने कोविड विरोधातल्या लढाईत मिळवलेल्या उपलब्धी आणि त्याचे उत्साहवर्धक परिणाम यांची माहितीही आपल्या सहकाऱ्यांना दिली. भारतात कोविड महामारीचा वृद्धीदर 2 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे आणि मृत्यूदरही जगात जवळपास सर्वात कमी , म्हणजे 1.45 टक्के इतका आहे. दररोज सरासरी दहा लाख चाचण्या करण्याच्या धोरणामुळे रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर देखील 6.25 टक्यांपर्यंत कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
मात्र कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही, अशावेळी कोविड पासून सुरक्षित राहण्याच्या नियमांचे पालन करत राहावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. कोविडची लस आल्यावर पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या सुमारे 30 कोटी लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. यावेळी एनसीडीसीचे संचालक डॉ सुजित सिंह यांनी यावेळी, कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी आणि संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना आणि त्याचे परिणाम याविषयी आकडेवारीसह सादरीकरण केले.