नाशिक| प्रतिनिधी| राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी रोहित अहिरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी केली आहे. विद्यार्थ्याच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच विद्यार्थी व सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस रोहित अहिरे यांनी आपल्या निवडीनंतर बोलतांना सांगितले.
रोहित अहिरे यांच्या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी व युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीनंतर पालकमंत्री ना.छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, माजी खा. समीर भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन, विभागीय अध्यक्ष चिन्मय गाढे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, माजी आमदार संजय चव्हाण, आ.दिलीप बनकर, आ.नितीन पवार, आ. माणिकराव कोकाटे, आ.सरोज अहिरे, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार दीपिका चव्हाण, तालुकाध्यक्ष सर्वश्री शैलेश सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे, संदीप पवार, यशवंत शिरसाठ, राजेंद्र भामरे आदींनी अभिनंदन केले आहे.