नाशिक| शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार मोहन रावले यांचे दुःखद निधन झाले. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातुन सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून आले होते.
एक गिरणी कामगाराचा मुलगा ते लोकसभेचा खासदार असा थक्क करणारा त्यांचा प्रवास होता. गिरणी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांच्या निधनाने गिरणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेतृत्व हरपले आहे. मी व माझे कुटुंबीय रावले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शोकभावन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.