नाशिक| देशभरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कॅटच्या वतीने देश-विदेशातील प्रमुख ई-काॅमर्स कंपन्यांविरोधात एल्गार पुकारण्यात आला. 'रिटेल डेमोक्रॅसी डे'चे औचित्य साधत मंगळवारी (ता.१५) कॅटचे राज्य उपाध्यक्ष मेहुल थोरात, रशमीन मजेठीया, नाशिक सराफ असोसिएशनचे पदाधिकारी किशोर वडनेरे आदींच्या शिष्टमंडळाने नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोइफोडे यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये भारतात ई काॅमर्सचे धोरण जाहिर करून त्यात योग्य अधिकार समिती नेमावी. लोकल ते व्होकल हे पंतप्रधानांचे अभियान सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी व्यापारी व शासकीय अधिकाऱ्यांची राष्ट्रीय संयुक्त समिती नेमून प्रत्येक जिल्हयात समीती नेमावी आदींसह विविध मागण्या कॅटच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.