नाशिक| प्रतिनिधी|झी टॉकीजवरील प्रसिध्द गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात दि.१६ आणि १७ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत निफाड तालुक्यातील भेंडाळी येथील कृष्णा महाराज कमानकर यांचा सुश्राव्य किर्तन होणार आहे.
मुळातच अध्यात्मिक वारसा लाभलेल्या कुंटुबातील कृष्णा महाराज भेंडाळी सारख्या लहानशा खेड्यातुन पुढे येत आळंदी येथे वारकरी संस्थेत शिक्षण घेतले. लहानपणापासुनच वारकरी साप्रंदाय आणि स्वामी समर्थांचे भक्त असलेले कृष्णा महाराज 10 वर्षापासुन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी किर्तन, प्रवचनरूपी सेवा देत धार्मिक व समाजसेवेचा वारसा अखंडपणे पुढे घेऊन जात आहेत.
उपक्रमास झी टॉकीजचे संचालक हेमंत पांचाळ यांचे सहकार्य मिळाले आहे. नाशिकसह महाराष्ट्रातील सर्व नागरीकांनी या सुश्राव्य किर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन भेंडाळी ग्रामस्थांसह वारकरी साप्रंदयातील किर्तनकार व प्रवचनकारांतर्फे करण्यात येत आहेत.