- क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी, अपघातानंतर कार जळून खाक - TheAnchor

Breaking

December 30, 2022

क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी, अपघातानंतर कार जळून खाक

नवी दिल्ली|दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुडकी येथे मर्सिडिज कार डिव्हायडरवर आदळून झालेल्या अपघातात भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला. आज पहाटे ५.३०च्या सुमारास साखर झोप लागल्याने कार डिव्हायडर आदळून  हा अपघात झाला अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. सुदैवाने या अपघातातून तो बचावला असून त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे.
Cricketer-Rishabh-Pant-seriously-injured-in-a-car-accident-the-car-got-burnt-after-the-accident
फोटो: सोशल मीडिया 
कार अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर कारचा जळून कोळसा झाला,  परंतु तत्पूर्वी ऋषभ पंत गाडीतून काच तोडून बाहेर आल्याने त्याचे प्राण वाचले त्यानंतर गाडीला आग लागून तिचा कोळसा झाला असे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यानंतर १०८ क्रमांकावर सूचना देऊन रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि उपचारांसाठी रूडकी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली, त्याला पुढील उपचारासाठी दिल्लीला हलविण्यात आल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले.