औरंगाबाद| युवक क्रांती दलाचा तरुण आणि लढाऊ चेहरा म्हणून शाम तोडकर मानले जातात. संघटना वाढविण्यासाठी ते मराठवाडय़ात लवकरच दौरा करणार असून युवती आणि महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. येणाऱ्या काळात शेतकरी, विद्यार्थी आणि दुर्बल घटकांसाठी विशेष कार्यक्रम राबविणार आहेत, अशी माहीती शाम तोडकर यांनी निवडीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
युवक क्रांती दलाची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली, युक्रांदचे ज्येष्ठ नेते अन्वर राजन यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात शाम तोडकर यांची मराठवाडा संघटकपदी एकमताने निवड करण्यात आली. युक्रांदच्या राज्य उपाध्यक्षपदी संदीप बर्वे, कार्यवाहपदी जांबुवंत मनोहर, राज्य संघटकपदी अप्पा अनारसे, सहकार्यवाहपदी राजकुमार डोंबे व रश्मी सोवनी यांची निवड करण्यात आली.
युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, नगर जिल्हाध्यक्ष सुदाम लगड, नीलम पंडीत, सुदर्शन चखाले, प्रसन्न मराठे