- संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला येणाऱ्या दिंडेकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या: स्थानिक ग्रामस्थांची जि.प. प्रशासनाकडे मागणी - TheAnchor

Breaking

January 2, 2023

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला येणाऱ्या दिंडेकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या: स्थानिक ग्रामस्थांची जि.प. प्रशासनाकडे मागणी

नाशिक| प्रतिनिधी| नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे श्री संतश्रेष्ठ  श्री.निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त राज्यातून अनेक भागातून पायी दिंडया येतात या दिड्या घेऊन येणाऱ्या  दिंडेकरांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून  जिल्हा परिषद अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांना तसे निवेदन देण्यात आले.
Basic-facilities-should-be-provided-to-Dindekars-coming-for-Sant-Nivrittinath-Yatra-Local-villagers-demand-to-z-p

यामुळे गावत स्वच्छता राहील  व रोगराईला आळा बसेल अशी विनंती निवेदनात करण्यात आली. यावेळी जिल्हापरिषद मुख्य अधिकारी  मित्तल मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी साहेब यांच्याशी चर्चा केली, तसेच या दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गावामध्ये मोबाईल टॉयलेट, फिरते स्वच्छतालय सारख्या सुविधा उपलब्द करून देऊ असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी निवृत्ती महाराज कापसे, दिपक वाघ, शरद मांडे, शंकर खांडबहाले, अजय खांडबहाले, पंकज वाकतकर, सोमनाथ खांडबहाले, नितीन खांडबहाले, तुषार डहाळे  आणि ग्रामपंचायत महिरावणी, ग्रामपंचायत गणेशगाव (नाशिक) ग्रामपंचायत बेलगावढगा ग्रामस्थ उपस्थित होते.