नाशिक| अभोणा येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. एकनाथ बाळा देसाई यांच्या पत्नी धनुबाई एकनाथ देसाई (९६) यांचे आभोणा येथील राहत्या घरी मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुले, मुलगी, नातू,पणतू असा परिवार आहे. जिल्हा परिषद नाशिकचे क. प्रशासन अधिकारी रविंद्र देसाई यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर कळवण तालुक्यातील अभोणा येथील गिरणाकाठी बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख शिक्षक नेते व संताजी मंडळाचे संचालक श्री हरिश्चंद्र देसाई, श्रीगृप फाउंडेशनचे उपाध्यक्ष बीएसएनएलचे अधिकारी सुधाकर देसाई, प्रा.डॉक्टर अशोक देसाई, एबीबीचे देविदास देसाई, शेतकरी विजय देसाई, जिल्हा परिषद नाशिकचे क. प्रशासन अधिकारी रविंद्र देसाई, व आरटीओ नाशिक मालेगावचे कार्यालयीन अधीक्षक श्री जितेंद्र देसाई यांच्या त्या मातोश्री होत्या. अंत्यदर्शनासाठी मविप्र संचालक रविंद्र देवरे, कळवण पंचायत समितीचे माजी सभापती विजय क्षिरसाठ, समाजकल्याण सभापती उषाताई बच्छाव, शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष काळूजी बोरसे, सुभाष अहिरे, धनराज वाणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे, जिल्हा परिषद पतसंस्था संचालक रविंद्र थेट, संजय सोनवणे, सचिन विंचूरकर, धनराज जाधव, वामन खोसकर , विश्वजित खैरे, आदीं विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शोकभावाना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.