नाशिक| शासनाच्या कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची संघटना असलेल्या राज्य कृषिसेवा महासंघांच्या पुनर्गठनासाठी सोमवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत महासंघाच्या अध्यक्षपदी कृषी संचालक कैलास मोते तर सरचिटणीसपदी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी विभागातील सर्व वर्गांतील संघटनांचा मिळून एकसंघ अशा महासंघाची पुनर्बांधणी करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष-संदीप केवटे, कार्याध्यक्ष- बालाजी ताटे, संजय पाटील व जितेंद्र पानपाटील, राज्य उपाध्यक्ष- विक्रांत परमार, प्रीती हिराळकर, बंडा कुंभार, शिवाजी राठोड, झाकीर हुसेन मुलाणी यांची ही निवड करण्यात आली.
कृषी सेवा महासंघ कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या खालील एकसमान प्रश्नावर काम करणार आहे.
1)आकृतीबंध- कृषी विभागाचा आकृतीबंध महसूल,ग्रामविकास,जलसंपदा या विभागाच्या धर्तीवर बळकट करतानाच, पदोन्नतीच्या संधी देणारा व कार्यालये बळकटीकरण करणारा करतानाच,समय मर्यादित पणे मान्य होण्यासाठी कार्य करणे. 2.)समकक्षता- केंद्रीय कृषी मंत्रालयाने सन 2017 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कृषी विभागाची समकक्षता राज्यातील इतर तांत्रिक विभागा बरोबर प्रस्थापित करणे. 3.)आस्थापना- अधिकारी/कर्मचारी यांचे आस्थापना विषयक प्रश्न सामोपचाराने मार्गी लावणे. 4.)पदोन्नती- कृषी विभागातील रखडलेल्या पदोन्नती जलदगतीने मार्गी लावणे. आदीं प्रश्नांवर भर राहणार आहे.
या बैठकीला कृषी विभागातील तांत्रिक तसेच अतांत्रिक अधिकारी/कर्मचारी यांच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,तसेच कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (विस्तार) श्री.विकास पाटील सा. व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गातील अति वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते अशी माहितीमहाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघाचे सरचिटणीस अभिजित जमधडे यांनी दिली आहे.