- इगतपुरीजवळ जिंदाल कंपनीत भीषण स्फोट; २ महिलेचा मृत्यू, १७ जण जखमी - TheAnchor

Breaking

January 1, 2023

इगतपुरीजवळ जिंदाल कंपनीत भीषण स्फोट; २ महिलेचा मृत्यू, १७ जण जखमी

नाशिक| इगतपुरी जवळील मुंडेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून आगीमुळे उंचच उंच धुराचे लोळ पसरलेले होते. एका मोठ्या बॉयलर मध्ये स्फोट झाल्याने ही घटना घडल्याचे कळते. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले. मुख्यमंत्र्यांनी इगतपुरी येथील घटनास्थळी भेट दिली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर केली व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील असे सांगितले.

Massive-explosion-at-Jindal-Company-near-Igatpuri

या दरम्यान कंपनीत कर्माचारी काम करत होते. अचानक स्फोट झाल्याने सुमारे २० हून अधिक कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना नाशिकच्या खाजगी आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, मात्र यात २ महिलांचा मृत्यू झाला असून १७ जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. याठिकाणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांशी बोलतांना नाशिक, ठाणे, एचएएल येथून अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आले अशी माहिती दिली आणि आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी या घटनेची माहिती मिळताच केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भरती पवार आणि पालकमंत्री दादा भुसे, आ. हिरामण खोसकर घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्याला गती दिली.