त्र्यंबकेश्वर| रेशनिंग दुकानदारांचे विविध प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर येथील श्री चंद्र गार्डन लॉन्स येथे फेडरेशनची आढावा बैठक झाली. या बैठकीत राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील व जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, खजिनदार ढवळू फसाळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी बैठकीला सर्व तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते. बैठकीत दुकानदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच त्र्यंबकेश्वरचे पुरवठा नाय तहसीलदार यांची भेट घेऊन दुकानदारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात दुकानदारांचे दोन थम त्यांच्या कुटुंबातले ठेवावे अशी मागणी करण्यात आली आणि कमिशन बाबत चर्चा झाली. शासनाला अहवाल पाठवू असे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले.
यावेळी निफाड तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे अध्यक्ष, वाल्मीक लांडगोळे, गणपत नेवगे सेक्रेटरी, नारायण ठुबे 2) इगतपुरी तालुका अरुण बागडे उपाध्यक्ष, गुलाब वाजे, सीमा जाधव, अपर्णा पाटील 3)पेठ तालुका धर्मराज चौधरी अध्यक्ष, दिलीप भोये, प्रकाश शेवरे, 4) सुरगाणा तालुका ऐवाजी भोई अध्यक्ष, हरी महाले सेक्रेटरी, भास्कर चौधरी उपाध्यक्ष, मिथुन चौधरी 5) बागलाण तालुका प्रवीण सावंत अध्यक्ष, रमेश मुळे सेक्रेटरी, गुलाब जैन, किरण खैरनार, विजय घुगे 6) सिन्नर तालुका सतीश भुतडा अध्यक्ष, चंद्रकांत माळी माजी अध्यक्ष, दीपक जगताप पदाधिकारी 7) देवळा तालुका - देवा गांगुर्डे अध्यक्ष, चेतन गुंजाळ, योगेश गुंजाळ, सोमनाथ सावकार, केदा आहेर सर्वांच्या समवेत व त्रंबक तालुक्याच्या सर्व दुकानदारांच्या समवेत एकमताने कमिटीची निवड करण्यात आली. त्रंबक तालुका कमिटी लालू आचारी अध्यक्ष, राम कजबे उपाध्यक्ष, हेमंत तरवाडे सचिव, ज्ञानेश्वर मेढे उपसचिव, किसन वारघडे कार्याध्यक्ष, युवराज चव्हाण खजिनदार, गणपत जाधव संपर्कप्रमुख आदीं उपस्थित होते.