नाशिक| नाशिक- शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बस आणि ट्रॅक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहे. जखमींवर नाशिक व शिर्डी येथे उपचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. अपघाताच्या चौकशीचे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.