- तरुणांनी स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यावर भर द्यावा: विनायक पांडे - TheAnchor

Breaking

January 10, 2023

तरुणांनी स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यावर भर द्यावा: विनायक पांडे

नाशिक|प्रतिनिधी| मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे  धावण्यापेक्षा स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यावर अधिक भर द्यावा आणि मेहनत व जिद्दीने तो व्यवसाय यशस्वी करावा असे, प्रतिपादन माजी महापौर विनायक पांडे यांनी केले. एमजीरोड येथील बीएससी चॅटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ  माजी महापौर विनायक पांडे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

Youngsters-should-start-own-industries-and-businesses-Vinayak-Pandey-bsc-chat-centet-nashik

उच्च शिक्षित तरुणांनी मिळून सुरू केलेल्या या उपक्रमाचे पांडे त्यांनी कौतुक केलं आणि संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोतदार मार्बल्सचे संचालक बाळुकाका पोतदार, बापू पगारे, उमेश खाडे, एमजीरोड बीएससी चॅट शाखेचे संचालक दिपक आहिरे, अक्षय उगले, राष्ट्रवादीचे अजय बागुल, ज्ञानदेव पांडे, करपेभान आव्हाड, टोनी गोसावी, प्रतीक पांडे, सुमित जाधव, बाबा चव्हाण, आदित्य दवे, अक्षय वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Youngsters-should-start-own-industries-and-businesses-Vinayak-Pandey-bsc-chat-centet-nashik

फोटो: माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह उपस्थित मान्यवर
नाशिक शहरात बीएससी चॅट सेंटरची साखळी तयार करण्याचा मानस असल्याचे बीएससी चॅट या ब्रँडचे मुख्य संचालक भूषण उगले यांनी सांगितले. या चॅट सेंटरच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आणि चवदार पाणीपुरी, भेळपुरीचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. खवय्यांनी एकदा भेट अवश्य भेट द्यावी असे आवाहन एमजीरोड येथील बीएससी चॅट शाखेचे संचालक दिपक आहिरे यांनी केले आहे. यावेळी संचालक प्रदीप नागरे यांनी मान्यवरांचे आभार मानले.