- 'आकांक्षेकडून अंत:प्रेरणेकडे' या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन प्रबोधनी प्रशाला येथे उत्साहात - TheAnchor

Breaking

February 5, 2023

'आकांक्षेकडून अंत:प्रेरणेकडे' या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन प्रबोधनी प्रशाला येथे उत्साहात

नाशिक|आकांक्षेकडून अंत:प्रेरणेकडे' या संकल्पनेवर आधारित  वार्षिक स्नेहसंमेलन भोसला महाविद्यालया जवळील प्रबोधनी प्रशाला इंग्रजी माध्यम शाळेत उत्साहात पार पडला.
Bhosla-college-yethil- udhyaprabodhini-yethe-snehasanmelan-utsahat
अनेक प्रसिद्ध व्यक्ती केवळ इच्छाशक्तीच्या बळावर अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यावर मात करून उत्तुंग यशोशिखरावर पोचल्या आहेत. यावेळी छोट्या परंतु परिणामकारक नाटिका आणि नृत्य यांच्याद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. मुंजे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यासह इतर सात व्यक्तिरेखा रेखाटण्याचा प्रयत्न शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अतिशय कौशल्याने आणि उत्स्फूर्तपणे केला .
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  IRS DY  कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स भूमिका सैनी उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की इच्छाबळ असेल तर माणूस  अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकतो. कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी  कार्यक्रमाच्या संकल्पनेच्या याच हेतूसाठी संस्था करत असलेल्या कार्याचे विश्लेषण केले. स्नेहसंमेलनासाठी संस्थेचे कार्यवाहक माननीय हेमंत देशपांडे, सदस्य गिरीश वैशंपायन, सुयोग शाह, श्री आनंद देशपांडे उपस्थित होते. मुख्याध्यापिका डॉ. अंजली सक्सेना यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.