नाशिक| आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमंतीत वाढल्या असून त्याचा परिणाम भारतात ही दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा 60 हजार रुपयांवर पोहचला आहे. सध्या लग्न समारंभासाठीचा काळ असून सोन्याचे दर कमी होण्याची वाट बघणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला ही अतिरिक्त झळ पडणार आहे, ही सोने भाव वाढ पुढे अशीच सुरू राहण्याची शक्यता ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी वर्तवली आहे.
![]() |
फोटो: फाईल |
श्री.अरोरा यांनी सांगितले की, बुधवारी रात्री आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत 1.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे, भारतातील सोन्याचा दर 60,000 रुपये (999 शुद्धता) प्रति 10 ग्रॅमच्या वर उघडला आहे. सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामध्ये ३ टक्के जीएसटीचाही समावेश आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 58,500 रुपये प्रति ग्रॅमच्या आसपास आहे. वास्तविक, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्के वाढ केली आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेत व्याजदर वाढले आहेत. आज रात्री आणि उद्या संध्याकाळी आणखी एक डेटा अमेरिकेत येणार आहे. याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाही व्याजदरात वाढ करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मग सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात.
पंकज अरोरा यांनी सांगितले की 2022 मध्ये दिवाळीच्या आसपास सोन्याचा भाव 51 ते 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली किंवा दिवाळीत सोन्याचे दागिने खरेदी केले, त्यांची गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे. 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा चांदीवर परिणाम झाल्याचे पंकज यांनी स्पष्ट केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अंमलात आल्यास, सोन्यावरील कस्टम ड्युटी किंवा सेस पूर्वीप्रमाणेच 15 टक्के राहील, परंतु चांदीवरील आयात शुल्क 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के होईल. चांदीची किंमत आजही आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा कमी आहे. सध्या जीएसटी धरून चांदीचा दर 73 हजार रुपये प्रति किलो आहे, जो कोरोनाच्या कालावधीनंतर 78 हजार रुपयांवर गेला आहे. यंदा सोन्याचा दर 62 हजार ते 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 90 हजार रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे, असे अरोडा यांनी सांगितले.
दर आणखी वाढण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दर वाढले असून सोने प्रति 10 ग्रॅमसाठी 58,608 रुपये असून 3 टक्के जीएसटी धरून सोने 60 हजार (एमसीएक्सवर) झाले आहे. तर चांदी 73 हजारावर पोहचली आहे. आगामी काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मेहुल थोरात, सचिव, कॅट