- रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श असे पंचेंद्रियांना समर्पित उद्यानाचे लोकार्पण - TheAnchor

Breaking

February 3, 2023

रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श असे पंचेंद्रियांना समर्पित उद्यानाचे लोकार्पण

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्ष असे  पंचज्ञानेद्रियांना समर्पित ’विद्यापीठ संवेदना उद्यान’ तयार करण्यात आले आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनंन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. 
Inauguration-of-a-park-dedicated-to-the-five-senses-of-taste-smell-hearing-sight-and-touch
याप्रसंगी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ, प्रमुख अतिथी म्हणून चेन्नई येथील कर्मचारी राज्य विमा निगम महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, लेफ्टनंन्ट जनरल डॉ. राजीव कानिटकर (निवृत्त) ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद पिंपरीकर, डॉ. षुभंागी पिंपरीकर, अधिष्ठाता डॉ. सुषीलकुमार झा, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे, डॉ. संजय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी संागितले की, पर्यावरण संवर्धनसाठी मानवी षरिरातील पंचज्ञानेंद्रीयांवर आधारित संवेदना उद्यान तयार करण्यात आले आहे. मेडिकल टुरिझमच्या अनुषंगाने विद्यार्थी व अभ्यागतांना संवेदना उद्यानातील वृक्षांची माहिती व मांडणी महत्वपूर्ण आहे. तसेच संवेदना उद्यान पर्यावरण व स्वास्थ्यासाठी सर्वांना उपयुक्त आहे. विद्यापीठात ’ग्रीन कॅम्पस’ उपक्रमांतर्गत मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. विद्यापीठ आवारात विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ यांनी सांगितले की, विविध वृक्ष, फुलझाडे यांचे वर्गीकरण करुन करुन विद्यापीठात संवेदना उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. जीवनात आत्मा, मन व इंद्रीय यांचे महत्व अधिक आहे. या तत्वांचा वापर करुन उद्यानात वृक्षलागवड करण्यात आली आहे. संवेदना उद्यानांत लागवड करण्यात आलेली वृक्ष परिसरात वावरतांना ध्वनी, गंध आदी इद्रियांना प्रभावित करतील अशी संकल्पना त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा चेन्नई येथील कर्मचारी राज्य विमा निगम महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या ग्रीन कॅम्पस उपक्रमांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संवेदना उद्यानाकरीता परिश्रम घेतले आहेत. उद्यानात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची काळजीपूर्वक जोपासणा करण्यात आली आहे. या वृक्षांचे वर्गिकरण रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श या पंचज्ञानेंद्रांवर आधारित आहे. संवेदना उद्यानाच्या निर्मितीत काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.  
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, संवेदना उद्यानाची संकल्पना अतिशय उल्लेखनीय आहे. पर्यावरण संवर्धनासमवेत आरोग्य स्वास्थ्यासाठी हे उद्यान उपयोगी आहे. वृक्षांचे वर्गीकरण, लागवड व केलेली जोपसणा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यापीठाचे उपकुलसचिव तथा हरीत कक्षाचे प्रमुख डॉ. सुनील फुगारे यांनी सांगितले की, विद्यापीठातील संवेदना उद्यानाच्या निर्मितीकरीता माजी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी अधिक परिश्रम घेतले आहेत. माननीय कुलगुरु महोदया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रीन कॅम्पस संकल्पना राबविली याचे मूर्त रुप विद्यापीठातील संवेदना उद्यान असल्याचे त्यांनी सांगितले.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार उपकुलसचिव डॉ. संजय नेरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. कुलगुरु महोदया यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.



रुची उद्यानातील वृक्ष- वनस्पती

फालसा, धामणी, अटरुन, भोकर, शिवण, जंगली अजान, अॅपल बोर, चोरोळी, सिताफळ, पेरु, अंजीर , आंबा, नारळ, चिकु , गोरख चिंच, फणस, सुपारी, मरुड शेंग, रामफळ, निंबु, संत्र्ाा, डॅªगन फुड, चेरी, मोसंबी, जांभुळ, चिंच, डाळींब.  
श्रवण उद्यानातील वृक्ष व वनस्पती
गोल्डन बांम्बु, मारवेल बांम्बु, पम्पस गा्रस, सादडा

गंध उद्यानातील वृक्ष- वनस्पती

कुडा, चित्रक, मेहंदी, निरगुडी, हेन्कल, अडुळसा, प्लंबेगो, अबोली, कोरंटी, कुफीया, मुसांडा, कबवासी, जाटारोफा, अॅलीसम, एक्सझोरा, धायटी, पारिजातक, अंकोल, मुचकुंद, टीकोमा, रातराणी, मधुकामिनी, मोगरा, प्लुमेरिया आल्बा, हिबिक्सस, गावराण गुलाब, अनंता, जाई, जुई, रानजुई, कुंदा, सोनचाफा, प्लुमेरिया रुबरा, सितारंजन, लेमणग्रास, मारवा 

दृष्टी उद्यानातील वृक्ष- वनस्पती

रोईओ, टाकला, तरवड, कन्हेर, फाईक्स, जास्वंद, हमेलिया पॅटर्नस्, क्रॉटन, टगर, शंकासुर, मालफिगीया