नाशिक|प्रतिनिधी|श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तथा संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा २०२३ ( वर्ष दुसरे ) वारकरी भूषण हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे.
आशीर्वाद हरिभक्त परायण वैकुंठवासी आत्माराम बाबा नाशिककर तसेच वै . ह.भ.प.बापू बाबा देवगावकर तथा गुरुवर्य माधव बाबा घुले तसेच. ह.भ.प.रामकृष्णदास महाराज लहवितकर ह .भ .प एकनाथ महाराज गोळेसर यांच्या आशीर्वादाने शुक्रवार दिनांक २४/ २ /२३ रोजी सुरुवात होईल, निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पादुकांचे पूजन होऊन आमदार हिरामण खोसकर संस्थानचे माजी अध्यक्ष, मुरलीधर पाटील .निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष, निलेश गाढवे व पंचकमिटी यांच्या हस्ते पूजन होऊन परिक्रमेला सुरुवात होईल.
२४ तारखेला सकाळी नाष्टा सुरेश गंगापूत्र यांचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जनार्दन स्वामी आश्रम येथे होईल दुपारी जेवण अंजनेरी भजनी मंडळ देतील दुपारचा विसावा खंबाळे रात्रीचे भोजन समस्त ग्रामस तळेगाव अंजनेरी येथे होईल
२५ तारखेला दुसऱ्या दिवशी जातेगाव . मुळेगाव .यांचा नाश्ता होईल दुपारचे भोजन वृंदावन लॉन्स वाडीवर येथे होईल दुपारचा विसावा मुकणे येथे होईल रात्रीचे भोजन समस्त ग्रामस्थ कावनई येथे होईल
२६ तारखेला सकाळचा रायांबे .( सरपंच ) व कऱ्होळे ग्रामस्त याचा होईल . दुपारचे भोजन ओंडली येथे होईळ . दुपारचा विसावा नागोसली (धारगाव ) धर्मराज खोडके . रात्रीचा मुक्काम वावी हर्ष येथे होईल संदिप भोसले ( धामनी ) व समस्त ग्रामस्त वावी हर्ष महाप्रसादाचे यजमान असतील .
२७ तारखेला सकाळी वावी ते देवगाव फाटा श्री . लहानू विठोबा गोवर्धने यांचा नाश्ता होईल दुपारचे जेवण स्वामी महाराज गोवर्धने यांच्याकडून डाळेवाडी येथे महा प्रसाद होईल . भास्कर घाट येथे दुपारचा विसावा . रामदास भाऊ नाठे यांचा, संध्याकाळी वावी हर्ष येथे महाप्रसाद होईल .
२८ तारखेला सकाळी दादाभाऊ शिरसाठ ( नाशिक ) यांचा नाष्टा होईल दुपारी ब्राह्मनवाडे येथे समस्त ग्रामस्त शिरसगाव यांच्या कडून महाप्रसाद होईल . पिप्रि त्र्यंबक येथे दुपारचा विसावा होईल . संध्याकाळी मुक्काम बेझे येथे होईल . महाप्रसादाचे यजमान . श्री .मधुकर चव्हाण . श्री . किरन नाठे हे असतील.
१ तारखेला सकाळी चक्र तीर्थ येथे नाष्टा समस्त ग्रामस्त गणेशगाव ( त्र्यंबक ) दुपारजे जेवन . व विश्रांती .समस्त ग्रामस्त पिंपळगाव गरुडेश्वर येथून कोटी तीर्थ व संध्याकाळी गणेशगाव ( नाशिक ) येथे मुक्काम व समस्त ग्रामस्त गणेशगाव ( नाशिक ) महाप्रसाद नंतर.
२ तारखेला सकाळी बेझे फाटा येथे श्री .दतु चौधरी श्री .रामदास जाधव यांचा नाष्टा . जानार्दन स्वामी आश्रम त्र्यंबकेश्वर येथे ह . भ .प. ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचे काल्याच्या किर्तनाने परिक्रमेची सांगता होईल . श्री .प्रकाश गंगाधर कोठुळे विहीत गाव यांचा काल्याचा महाप्रसाद होईल . विशेष टीप .रस्त्याने चालताना काकडा . हरिपाठ . व रात्री वाटचालीचे कीर्तन होईल कोणीही व्यसन करणार नाही व्यसन केल्यास एक हजार रुपये दंड केला जाईल . अशी माहिती निवृत्ती महाराज कापसे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर तथा श्रीमान निवृत्तीनाथ महाराज पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ यांनी दिली