नाशिक|गणेशगाव नाशिक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन हभप निवृत्ती महाराज कापसे यांची पुन्हा सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या 33 वर्षापासून ते संस्थेवर कार्यरत आहे.
याप्रसंगी शंकरभाऊ खांडबाहाले, कैलास खांडबहाले यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड केली. कापसे यांच्या निवडीनंतर मा. खा. देविदास पिंगळे, मा. खा. समीर भुजबळ, आ. सरोज आहिरे, आ. हिरामण खोसकर, मुरलीधर पाटील, विष्णुपंत म्हैसधुणे , भाऊसाहेब खांडबहाले, मधुकर खांडबहाले, भाऊसाहेब पालखेडे, दिनकर लिलके, रामदास चव्हाण, रमेश खांडबहाले, अमृता डाहाळे, साहेबराव चव्हाण, भिमराव कापसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघ आदींनी त्यांचे अभिनंदन केले.