त्र्यंबकेश्वर| हृदय सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमीत्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव(काचुर्ली) येथील कामडपाडा वस्तीत जेष्ठ महिलांना पारंपारीक गुजरी फडकीचे वाटप करण्यात आले. यावेळी हृदय सोशल फाउंडेशनचे संचालक चंद्रशेखर (सी.एस.) सिंग, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, पटेल याच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कामडी, शांताराम झोले, दिलीप पवार तसेच गावातील जेष्ठ नागरीक उपस्थित होते.