नाशिक|केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपच्या महिला कार्यकर्त्यांनी चूल मांडून त्यावर भाकरी थापल्या शेकल्या आणि महागाईचा निषेध केला. महिलादिनीच रस्त्यावर केलेल्या या आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधले. महागाई कमी करावी आणि शेतमालाला भाव मिळावा अशा घोषणा आम आदमी पार्टीतर्फे देण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारतर्फे दर चार ते पाच महिन्यांनी गॅस दरवाढ केली जात आहे. सतत होणारी ही दरवाढ ही गरीब वंचित शोषित लोकांचे आर्थिक नुकसान करणारी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आम आदमी पार्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूक मांडून त्यावर भाकरी थापून जेवणाचे दृश्य मांडून आप कार्यकर्त्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले, ज्या पद्धतीने उद्योगपती आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार ठेवतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, हा जो विद्यमान सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय चालला आहे. तो तात्काळ थांबविला गेला पाहिजे, शेतकरी हा अन्नदाता असून त्याने जर अन्न पिकवणे बंद केले तर देशात हाहाकार माजेल, त्याचीच सरकारने जर काळजी घेतली नाही तर तो पूर्णपणे कोलमडेल आणि देशातील अन्न व्यवस्था विस्कळीत होईल.
ह्यावेळी पूर्व विधानसभेचे अध्यक्ष योगेश कापसे, देवळाली विधानसभेचे अध्यक्ष गिरीश उगले पाटील, शहर युवा अध्यक्ष अमर गांगुर्डे, शहर युवा सचिव प्रदीप लोखंडे, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष अभिजीत गोसावी, पूर्व महिला अध्यक्ष शेतांबरी आहेर, प्रसिद्धी प्रमुख चंदन पवार, युवा उपाध्यक्ष संदीप गोडसे, आणि पदाधिकारी मेघराज भोसले,अनिल फोकणे, नविंदर अहलुवालिया, दिपक सरोदे, नंदू ठाकरे, संतोष राऊत, चंद्रशेखर महानुभव, दिलीप कोल्हे, सुमित शर्मा, विश्वजित सावंत, निर्मला दाणी, शकुंतला वाघ, स्वप्नील घिया, शांताबाई बनकर, मंगला पोरजे ,पुष्पा विष्णू आहेर सखुबाई धुळे, मोना लक्ष्मण जाधव ,मीना महाले, प्रसिध्दी प्रमुख चंदन पवार यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.