- सोन्यावर हॉलमार्क आजपासून अनिवार्य! कशी असेल योजना वाचा - TheAnchor

Breaking

April 1, 2023

सोन्यावर हॉलमार्क आजपासून अनिवार्य! कशी असेल योजना वाचा

नाशिक|प्रतिनिधी|देशात आजपासून (दि.१ एप्रिल) गोल्ड हॉल मार्किंग अनिवार्य झाले आहे.  दागिन्यांची विक्री करण्यासाठी आता ६ अंकी अल्फा न्यूमरिक हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) अनिवार्य करण्यात आले आहे, असे ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सांगितले. 
Gold-hallmarking-has-become-mandatory-from-today.
श्री अरोरा म्हणाले की, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) केअर अॅपवर दागिन्यांचे वजन प्रदर्शित करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.  आजपासून हुड (HUID) पूर्णपणे अनिवार्य झाले आहे.  सर्व जुन्या हॉलमार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. १ जुलै २०२१ रोजी बीआयएसने पाठवलेला जुना हॉलमार्क स्टॉक (४ मार्क) डिक्लेरेशन फॉर्म भरलेल्या ज्वेलर्सनाच BIS 90 दिवसांचा वेळ देणार आहे, फक्त तेच ज्वेलर्स जुन्या मुद्रांकाचा शिल्लक साठा विकू आणि दाखवू शकतील. 

जुन्या हॉल मार्कच्या दागिन्यांवर हुडची (HUID) मागणीही ४ मार्क न काढता मान्य करण्यात आली आहे. आजपासून हॉलमार्क शिवाय सोने खरेदी विक्री होणार नाहीये. कोणत्याही दुकानदाराला हॉलमार्कशिवाय सोने विकता येणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे पारदर्शकता येणार असल्याचे पंकज अरोरा यांनी सांगितले.  

सध्या हॉलमार्किंग अनिवार्य योजना देशातील 288 जिल्ह्यांमध्ये लागू आहे, जेथे हॉलमार्कशिवाय दागिन्यांची विक्री करणे बेकायदेशीर असेल.  BIS नियमांनुसार सोन्यात हॉलमार्किंग अनिवार्य आहे.  कोणत्याही दागिन्यांवर हॉलमार्किंग असेल तर ते शुद्ध आहे.  कॅरेट आणि शुद्धतेनुसार हॉलमार्किंग मार्क्स लावले जातात.  जसे की 22K916 (91.6 टक्के शुद्धतेसह 22 कॅरेट सोने), 18K750 (75 टक्के शुद्धतेसह 18 कॅरेट सोने) 

हुड(HUID) या पद्धतीमुळे ग्राहक व सराफ यांच्यातील विश्र्वास अजून दृढ होणार असून ग्राहकाने खरेदी केलेल्या दागिन्यास मोडत्या वेळी पण पूर्ण भाव प्रमाणे मोबदला त्यास मिळणार आहे.तसेच नाशिक मधील सराफ व्यवसायिकानी परवाना काढून आपला माल HUID पद्धतीने विक्री करत आहेत. असे ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्ड्समिथ फेडरेशनचे मेहुल थोरात यांनी स्पष्ट केले.