- इगतपुरी विहारात (दि.१४) डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मदेशना आणि आरोग्य शिबिर कार्यक्रमांचे आयोजन - TheAnchor

Breaking

April 13, 2023

इगतपुरी विहारात (दि.१४) डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मदेशना आणि आरोग्य शिबिर कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक| भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती  निमित्ताने शुक्रवारी मोफत आरोग्य चिकीत्सा शिबीराचे आयोजन इगतपुरी सुगतविहार येथे करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन आ. हिरामण खोसकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच चंद्रपूर ताडोबा व्याग्र प्रकल्प येथील भंते शीलजोती हे रात्री धम्मदेशना देणार आहे.
इगतपुरी तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान प्रसारक विकास मंडळ इगतपुरी व महानगर आयुर्वेद सेवा संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन आ. हिरामण खोसकर यांच्या हस्ते होणार आहे. शिबिराची वेळ सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत राहणार आहे. 

शिबिरात आयुर्वेद सेवा संघाचे डॉ. प्रदीप मिश्रा(एम.डी), खुशबू पांब्रा (एमडी), डॉ.पौर्णिमा बियाडे (एमडी), डॉ.नताशा शेषराव(एमडी), शिवांगी मिश्रा (एमडी), सुचेता शेठ(एमडी), डॉ.वसंत भूमकर(एमडी), डॉ. सचिन कुडमटे (एमडी), डॉ.विनायक तायडे (एमडी), डॉ.हेमंत ठाकूर (एमडी), डॉ. शिक्षा मिश्रा (एमडी), डॉ.प्रथेमश शेठ(एमडी), आदी तज्ञ डॉक्टरांचा सहभाग राहणार आहे. शिबिरात अस्थी परिक्षण, रक्त, शुगर तपासणी व मोफत औषधे दिले जाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भास्कर बर्वे यांनी केले आहे. तसेच रात्री ९ ते १० वंदना व धम्मदेशना चंद्रपूर ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथील भंते शीलजोती करणार आहे, असे कळविण्यात आले आहे.