दिल्ली| भारतीय रेल्वेने 2022-23 मध्ये 1512 मे.टन मालवाहतूक केली आहे जी आर्थिक वर्ष 2021-22 मधील 1418 मे.टन 6.63 टक्क्याच्या तुलनेत 27.75 टक्के वाढ झाली आहे. एका आर्थिक वर्षासाठी ही आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारतीय रेल्वेने 2.44 लाख कोटी रु.चा महसूल प्राप्त केला आहे. 2021-22 मध्ये रु.1.91 लाख कोटींच्या तुलनेत 2022-23 मध्ये 27.75 टक्क्याची वाढ नोंदवली आहे. “हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून भारतीय रेल्वने व्यवसायात सुलभता सेवा सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ज्यामुळे पारंपारिक आणि अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या कमोडिटी प्रवाहातून रेल्वेला नवीन वाहतूक प्राप्त होत आहे. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि व्यवसाय विकास युनिट्सचे कार्य तसेच गतिमान धोरण तयार करून, रेल्वेला महत्त्वपूर्ण यश मिळत आहे.