नाशिकरोड|प्रतिनिधी|भुसावळ- पुणे-भुसावळ (ट्रेन क्र. 11025/11026) ही प्रवासी रेल्वेगाडी २० मे पासून १९ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुटीतच रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुटीसाठी अगोदरच नियोजन करून रिझर्व्हेशन केलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना आता पुण्याला किंवा भुसावळाला जाण्यासाठी खासगी वाहने, एसटीचा आधार घ्यावा लागणार आहे.
रेल्वेच्या तुलनेत रस्ता प्रवास अधिक खार्चिक व ताणतणावाचा आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस ही इगतपुरी-पुणे-इगतपुरी दरम्यान अंशतः रद्द करून प्रवाशांच्या सोयासाठी भुसावळ- इगतपुरी- भुसावळ दरम्यान मेमू रेल्वेगाडी (रेक क्रमांक 11119-11120) चालवली जाणार आहे. मात्र, पुण्याला थेट जाणारी रेल्वेगाडी नसल्याने तीचा फारसा उपयोग नाही.