नाशिकरोड| बालाजी सीएनजीचे संचालक भाजपाचे शहर चिटणीस राजेश आढाव या भागातील लोकाभिमुख आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे, त्यांचे सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात चांगले काम असून भविष्यात त्यांच्या हातून आणखी चांगली कामे घडावे अशा शब्दात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी राजेश आढाव यांना शुभेच्छा दिल्या.
दसक भागातील बालाजी सीएनजी येथे भाजपाचे शहर चिटणीस राजेश आढाव यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. याप्रसंगी आढाव यांचे अभिष्टचिंतन करतांना ते बोलत होते. राजेश आढाव हे शांत, संयमी मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित आहे. परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणीत मदतीला धावून जाणे त्यांचा स्थायीभाव आहे. कुठल्या ही कार्यात त्यांचा उत्साह वाखण्याजोगा असतो म्हणून ते कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्याअनुषंगाने शुभेछा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची येथील उपस्थिती सर्व काही सांगून जाते.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सुनील आडके, कैलास आढाव, प्रकाश बोराडे, ज्ञानेश्वर बोराडे, संजय कीर्तने, अण्णा आढाव, विश्वजित सहाणे, शरद मोरे, राम शिंदे, रौफ पटेल, राहुल कोठमिरे, राहुल बोराडे, गोकुळ बोराडे, रंजना बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजेश आढाव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.