नाशिक|प्रतिनिधी| मुंबई येथे ऑल महाराष्ट्र शॉप किपर्स फेडरेशन पुणे यांची अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या समवेत बैठक झाली. धान्य दुकानदारांच्या विविध प्रश्नाकडे फेडरेशनचे अध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांनी लक्ष वेधले. त्यात दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे, असे निवृत्ती कापसे यांनी कळविले आहे. यावेळी राज्यातील प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
तसेच विविध मागण्या पुढीलप्रमाणे: अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्व दुकानदारांना माल लवकर मिळावा व मशीनमध्ये लवकर टाकण्यात यावा, दर महिन्याला मशीन डाटा लवकर टाकण्यात यावा, नेटवर्क उपलब्ध करून दयावे, कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, धान्य वजन करून मिळावे, 'पीएमजेके'चे प्राधान्य कमिशन त्वरीत मिळावे, कमिशन मंत्रालयातूनच टाकण्यात यावे, तसेच सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहे. प्रत्येक कार्ड धारकाचा थम असल्यामुळे सर्व ऑनलाईन दिसत असल्यामुळे आता ग्राम दक्षता समितीच्या इतिवृत्ताची आवश्यकता नाही हडोळसे पाटील यांनी अन्न सचिव यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे दुकानदाराची अडवणुक होत असून या सर्व गोष्टी प्रधान सचिव यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सर्व गोष्टी प्रधान सचिव यांनी समजून घेतल्या, तसेच सकारात्मक चर्चा झाली. या प्रसंगी नेत्रा मानकामे, कोळेकर साहेब, पूजा मानकर मॅडम ,गजानन देशमुख साहेब, अस्मिता पाटील, वित्त सचिव घाडगे साहेब, राज्यध्यक्ष गणपत डोळसे पाटील, बाबुराव ममाने, शंकर सुरवसे, दिलीप नवले, निवृत्ती कापसे, संजय देशमुख शहाजी लोखंडे, विवेक भैरे, हरिष गुप्ता व राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.