नाशिक| प्रतिनिधी| श्रीक्षेत्र रेडेश्वर महाराज समाधी मंदिर आळे ता. जुन्नर जिल्हा, पुणे येथे संतभूमी उपासना व पारायण मंडळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. १७ ते २४ मे २०२३ दरम्यान करण्यात आले आहे.
ज्या महाराष्ट्रभूमीत ज्या रेडेश्वराला माऊली संत ज्ञानेश्वर महाराज याचा संघ झाला व पशु वेद बोलला त्या रेडेश्वराला संतत्व प्राप्त झाले. अश्या संतरेडेश्वर महाराजांच्या भूमीत जेथे माऊलीने त्यांना समाधी दिली, तेथे काकडा आरती .भजन तसेच. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली ) यांचे रोज सायंकाळी . ४ .ते. ६ श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र होईल, तसेच रोज ६ .ते ८ . कीर्तने अनुक्रमे रोज .
१) ह.भ. भ .जयेश महाराज भाग्यवंत भिवंडी.
२ ) ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे .( निफाड )
३ ) ह . भ .प. केशव महाराज नामदास .( पंढरपूर )
४ ) ह . भ .प. एकनाथ महाराज सदगीर . ठाणे
५ ) ह .भ.प. दिनकर महाराज अंचवले .( शेवगाव . धाकटी पंढरी आत्मा.
६ ) ह . भ .प. पोपट महाराज पाटील ( कासारखेडे .
७ ) ह .भ .प. ज्ञानेश्वर मावली कदम ( छोटे माऊली .आळंदी ) यांचे जागराचे व काल्याचे किर्तन होईल .
तसेच महाप्रसाद व चहा, नाष्टा जेवनाची व्यवस्था, राहाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोणतेही व्यसन असलेल्या व्यक्तीने येऊ नये, नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरातून या कार्यक्रमाला मानाच्या दिंडयाचे वारकरी, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र पंढरीचे व श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचे वारकरी उपस्थित राहणार आहेत. आळंदी, सासवड .श्रीमाननिवृत्तीनाथ महाराज तथा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पंचक्रोशी मंडळ उपस्थित राहणार आहे . भाविकांनी या कार्यक्रमाचा व श्रवण सुखाचा लाभ घ्यावा हरिभक्त परायण वारकरी भूषण ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होऊन महाप्रसाद होईल.