नाशिक| आंबेडकरी चळवळीचे झुंजार, लढाऊ नेते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष-युथ रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पॅंथर मनोजभाई संसारे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले, त्यांच्यावर दादर चैत्यभूमी येथे रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.