- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पेन्शनसाठी आंदोलन - TheAnchor

Breaking

January 12, 2024

रेल्वे कर्मचाऱ्यांचे पेन्शनसाठी आंदोलन

नाशिकरोड|प्रतिनिधी|सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे नाशिकरोड रेल्वेस्थानकात चार दिवस आंदोलन करण्यात आले. रेल्वे अधिकारी कुंदन महापात्रा, कर्मचारी सहदेव सोनवणे, कुणाल खरे, अजय डिंगिया, अमोल ठोंबरे, मुकुंद शिंदे, रामकृष्ण चितणार आदी सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकातील कुलीदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.

By-Railway-Employees-Agitation-for-pension
नॅशनल रेल्वे मजदूर यूनियनचे महामंत्री वेणू नायर यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विविध रेल्वे स्थानकांमध्ये चार दिवस आंदोलन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.