नाशिक| प्रतिनिधी| गोदातीर विद्युत रोषणाईने उजळला असून ठिकठिकाणी रामायणातील प्रसंगाचे सुंदर रेखाटन करण्यात आले आहे. त्यासाठी २०० चित्रकार, कलाकार ४८ तास राबत होते. त्यामुळे गोदातिरी जणू प्रभूश्रीराम - सीतामाता आणि लक्ष्मण साक्षात अवतरल्याची भावना भाविकांमध्ये होती, सध्या सजलेला गोदाघाट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये आहे. त्याचा नाशिकमध्ये रोडशो झाला. त्याअनुषंगाने नाशिक मधील गोदाघाट आणि तपोवन परिसराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी रामायणातील प्रसंग रेखाटण्यात आले आहे. २०० चित्रकार,कलाकार ४८ तास राबत होते रामायण आणि महाभारत पंचवटीत काट्या मारुती मंदिर,नागचौक,काळाराम मंदिर रामकुंड, तपोवन येथे अवतरले आहे. योगेश कमोद यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो निमित्ताने शहर सजावट करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी निवड केली. या ठिकाणी नाशिककरांनी एकदा तरी भेट द्यावी