- शहरात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ मोहीम - TheAnchor

Breaking

February 26, 2024

शहरात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ मोहीम


3-March-Pulse-Polio-Campaign-in-the-city

नाशिक|राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत नाशिक महानगरपालिकेत आज  रोजीआयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर  यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात सिटी टास्क फोर्सची सभा आयोजित करण्यात आलेली होती. दि . ३ मार्च २०२४ रोजी नाशिक शहरातील  २ लाख १२६  लाभार्थी बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. 

नाशिक  शहरात यासाठी  ८७६ बूथ असणार आहे  ६५ ट्रान्झिट टीम असणार आहे तर ४२ मोबाईल टीम असणार आहे.असे एकूण ९८३ बूथ असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दर वर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते.गेली २५ वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्व जण योगदान देत आहे. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च-२०१४ मध्ये मिळाले आहे. 

दरम्यान पोलिओच्या समूळ उच्चाटनाच्या अनुषंगाने नेहमीप्रमाणे विशेष पल्स पोलिओ मोहीम लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ३ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान ही लसीकरण मोहीम राबविली जाईल. ज्या मुलांचे पोलिओ डोस काही कारणास्तव राहून जातील त्यांना ४ ते ८ मार्च दरम्यान आयपीपीआयअंतर्गत घरभेटी, मोबाईल टीम, ट्रान्झिट टीम, नाइट टीमद्वारे पोलिओ डोस दिला जाईल.या विशेष पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व लाभार्थ्यांनी  घ्यावा व मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी केले आहे.

सिटी टास्क फोर्सच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, सहा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंखे,प्रशांत शेटे,शिक्षण अधिकारी बी.टी.पाटील, WHO संघटनेचे सदस्य डॉ.प्रकाश नांदापूरकर,रोटरी क्लबचे मंगेश अपेक्षांकर आदींसह  अधिकारी व कर्मचारी उपस्तित होते.