नाशिक|छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांपूर्वी घडविलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्य निर्माण होत असताना, आणखी एक गोष्ट रूप घेऊ लागली होती आणि ती म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन. महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरू करणे ही काही साधारण घटना नव्हती. या घटनेचा आणि छत्रपतींच्या शिवराईसह मराठा साम्राज्यातील चलनांवर छत्रपती शिवाजी महाजरांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या दर्शनिका विभाग आणि के. टी. एच. एम. महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा रविवारी, १७ मार्च रोजी गंगापूररोडवरीलके. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या व्हीएलसी सभागृहात होत आहे. ही कार्यशाळा सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेत चार वक्ते मराठा साम्राज्यातील चलन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. १)श्री प्रशांत ठोसर, २) श्री पुरुषोत्तम भार्गवे, ३) श्री आशुतोष पाटील, ४)श्री रमेश पडवळ
‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे उद्घाटन श्री नितिन मुंडावरे सर उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असून, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दर्शनीका विभागाचे सचिव डॉ दिलीप बलसेकर व KTHM कॉलेजचे प्राचार्य आर. डी . दरेकर उपस्थित राहणार आहेत. राज्य परिसंवाद मध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी ९८५०१११५०३ (चेतन राजापूरकर ) या नंबरवर करायची आहे
इतिहास अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण
छत्रपति शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकला ३५० पूर्ण झाले या निमित्ताने मराठा साम्राज्याचे चलन याविषयी परिसंवाद महाराष्ट्र शासन व KTHM महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. हा कार्यक्रम इतिहास अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे सर्व अभ्यासकांनी जरूर सहभागी व्हावे
चेतन राजापूरकर
प्राचीन नाणे संग्राहक व अभ्यासक