- नाशिक-दिंडोरी-धुळे २० मे तर नंदुरबार-जळगाव-रावेर १३ मे रोजी मतदान - TheAnchor

Breaking

March 17, 2024

नाशिक-दिंडोरी-धुळे २० मे तर नंदुरबार-जळगाव-रावेर १३ मे रोजी मतदान

नवी दिल्ली| लोकसभेची निवडणूक शनिवारी जाहीर झाली. देशातील ५४३ जागांसाठी ७ टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे, तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तीन मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. तर नंदुरबार, जळगाव आणि रावेरसाठी १३ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे.  तर ४ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

Nashik-dindori-election-20-may-and-nandurbar-jalgaon-dhule-on-13-may
Photo:ECI

महाराष्ट्रातील पाच टप्पे पुढील प्रमाणे

 ∆ टप्पा पहिला- 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

∆ टप्पा दुसरा- 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

 ∆टप्पा तिसरा- 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

 ∆टप्पा चौथा- 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

∆टप्पा पाचवा - 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ


निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत‌ दिलेली माहिती

नोंदणीकृत मतदारांची संख्या - ९७ कोटी
महिला मतदार - ४७.१ कोटी
नवे मतदार - एक कोटी ८० लाख
तरुण मतदार - १९.७४ कोटी (२०-२९ वर्षं)
दिव्यांग मतदार - ८८.४ लाख 
१०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार -  २.१८ लाख
ईव्हीएमची संख्या - ५५ लाख
पोलिंग बूथ - १०.५ लाख
निवडणूक कर्मचाऱ्यांची संख्या - दीड कोटी..