नाशिक| काँग्रेस नेते राहुल गांधीं यांनी आज त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते रुद्राभिषेक आणि आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी परिवाराची वंशावळ ही बघीतली.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी गुरवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबकराजाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, रुपाली भूतडा, स्वप्निल शेलार आदी उपस्थित होते. यावेळी देवस्थान ट्रस्ट मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मनोज थेटे यांनी राहुल गांधी यांना वंशावळ दाखविली, त्यात मोतीलाल नेहरु यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिल्याचा व गांधी घराण्याचा उल्लेख असल्याचे दाखविले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, राजाराम पानगव्हाणे, आ. हिरामण खोसकर, संपत सकाळे, कैलास मोरे, किरण भुसारे, रतिश टरले, नितीन जीवने आदी उपस्थित होते. पौरोहित्य मनोज थेटे यांनी केले
*