नाशिक|इगतपुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ज्ञान प्रसारक विकास मंडळ, सुगत विहारचे अध्यक्ष भास्कर बर्वे यांना महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित आले. मुंबई येथे एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इगतपुरी शहरातील शैक्षणिक व सामाजिक कार्यात बर्वे यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणे, मागासवर्गीयांना मदत करणे. त्यांच्या या समाजकार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.