नाशिक| प्रतिनिधी| शहरासह जिल्ह्यातील दुकानदाराच्या विविध मागण्यांबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनतर्फे निवेदन देण्यात आले.
प्रत्येक महिन्याला कमिशन वेळेवर मिळावे मागील भरलेले पैसे परत मिळावे तसेच धान्य मोजून मिळावे इपॉस मशीनला नेटवर्क नसते त्याची व्यवस्था करावी, तसेच काही तालुक्यामध्ये सुतळीसाठी पैशाची मागणी केली जाते सुतळी शासनाने उपलब्ध करुन दयावी. काही तालुक्यात दुकानदारांकडून हमालीची मागणी केली जाते, शासननिर्णयानुसार वाहतूक व हमाली मुक्त आहे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी गणपत डोळसे पाटील, निवृत्ती महाराज कापसे, योगेश बत्तासे, फारूक शेख, दिलीप नवले, चेतन घोलप, अरुणाताई चव्हाण, रमेश मुळे, संतोष सोनवणे व पदाधिकारी उपस्थित होते.