नाशिकरोड|पहिलं पाऊल नाशिक व मुंबईतील अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या कर्मचा-यांनी दरवर्षी प्रमाणे प्रोजेक्ट स्टेशनरी उपक्रम राबवविला. त्र्यंबकेश्वर येथील कळमुस्ते, जावळ्याचीवाडी, दुगारवाडी, हर्षेवाडी, जांभूळवाडी, उभ्रांडे या आदिवासी पाड्यांवर पहिली ते पाचवीच्या सहा शाळांमधील १६० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना वर्षेभराच्या वही, पेन्सिल, कंपास व चित्रकलेचे साहित्य तसेच प्रत्येक शाळेस क्रिकेटचा सेट, फुट बॉल, व्हॉली बॉल व नेट, बॅडमिंटन रॅकेट, स्किपिंग रोप देखील देण्यात आले. अथेना कंपनीचे प्रमोद सकट, संजय सिंग, गिरिष ठक्कर, अलका सारंग, निश्मन विसपुते, अखिल म्हात्रे, पेठराज मेहता, अस्मिता सारंग, गोविंदभाई चंदे, विश्वनाथ मालाणी, अतुल मालाणी, योगेश कुलकर्णी, राजू कटारे, युगश्री राजवाडकर आदी उपस्थित होते.
पहिलं पाऊल संस्था दहा वर्षांपासून जावळ्याची वाडी, दुगार वाडी, कळमुस्ते, हर्षेवाडी, जांभूळवाडी, उभ्रांडे या शाळांमध्ये विविध प्रकल्प राबवत आहे. यावर्षी मुलांना चित्रकलेचे साहित्य देण्यात आले.