- संस्कृत भाषेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी - TheAnchor

Breaking

July 10, 2024

संस्कृत भाषेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी

नाशिक| भविष्यात संस्कृत भाषेमुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी निर्माण होतील असा सूर संस्कृत विषयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात उमटला.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित, विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी शाळेत इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या प्रत्येक तुकडीतील संस्कृत विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या अशा एकूण २७ विद्यार्थ्यांना शंकराचार्य न्यास संकुल, नाशिक यांच्यातर्फे सन्मानपत्र व रोख रक्कमेचा धनादेश असे पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शंकराचार्य न्यास संकुल, नाशिकचे विश्वस्त ॲड. मनीष चिंधडे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी संस्कृत भाषेचे महत्व तसेच संस्कृत भाषेत भविष्यात उपलब्ध असलेल्या संधी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक चे वितरण करण्यात आले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या अध्यक्षा आसावरी धर्माधिकारी, मुख्याध्यापक राजन चेट्टियार, पर्यवेक्षिका प्रियंका भट यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्कृत शिक्षिका स्मिता जोशी व श्रध्दा घोलप यांचे मार्गदर्शन लाभले होते.