नाशिक| नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा ते पिंपळगाव बसवंत या दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे, महामार्गावर ठिकठीकाणी मोठ-मोठे खड्डे झाले असून या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोटी टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी घोषणा बाजी करुन कार्यकर्त्यांनी रस्ता दुरुस्ती होईपर्यंत वाहनांकडून टोल वसूली करू नये अशी मागणी केली, तसेच राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, घोटी टोलनाक्या अंतर्गत असलेल्या कसारा ते पिंपळगाव बसवंत या मार्गावर मोठे- मोठे खड्डे झाले असून नाशिक ते मुंबई हा प्रवास ७-८ तासांवर जाऊन पोहचला आहे, तसेच महामार्गाचे जे काम चालू आहे ते निकृष्टदर्जाचे आहे. जो पर्यंत महामार्गाची दुरुस्ती होत नाही व महामार्गाचे कामपूर्ण होत नाही तोपर्यंत घोटी टोलनाक्यावरुन सर्व वाहनांना टोलमुक्ती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करून वाहनांना टोल न आकारता सोडण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँगेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वात, जिल्हाध्यक्ष शाम हिरे ,उमेश खताळे, गणेश गायधनी, तुषार जाधव, संदीप भेरे, किरण कातोरे, काशिनाथ कोरडे, सोमनाथ घारे, नवनाथ लांगे, शांतराम झोले, निलेश धांडे, अनिकेत गोडसे, नरेंद्र गतीर, नवनाथ वाजे, तेजस भोर, यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
नाशिक मुंबई प्रवास लांबला
नाशिक- मुंबई महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने अनेक अपघात होत आहे. नुकताच एका विद्यार्थ्याचा अपघातात बळी गेला. नाशिक- मुंबई प्रवास ही ७ तासांचा झाला आहे. रस्त्याच्या दुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने वाहनधारकांना त्वरीत दिलासा देण्यासाठी टोलमुक्ती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पुरुषोत्तम कडलग
रायुका शरदचंद्रजी पवार पक्ष
प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग