नाशिक| मनपाच्या सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा विभागातर्फे मुख्य जलवाहिन्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून शहरातील पाणी पूरवठा शनिवारी दि. १३ जुलै रोजी पूर्ण दिवस आणि रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
![]() |
File:photo |
विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे आदी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे, तसेच गंगापूर धरण पंपीग स्टेशन येथील सिव्च यार्ड चेंज ओव्हर स्ट्रक्ररची कामे केली जाणार आहे.
पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुरूस्तीचे कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे, त्यामुळे संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवार दि. १३ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजेपासुन पूर्ण दिवस होऊ शकणार नाही. तसेच रविवार दि. १४ रोजी सकाळचा संपूर्ण नाशिक मनपा क्षेत्रातील पाणी कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपा सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे (पाणी पुरवठा) कार्यकारी अभियंत्यांनी पत्रकान्वये केले आहे.