नाशिक| सणासुदीचा काळ असल्याने सोन्याची चमक आणखी वाढली असून सोने दर २६९४ ते २७२७ डॉलर इतका होता, म्हणजेच जीएसटीसह सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅमला ७९००० रुपयांवर जाऊन पोहचले. बुधवारी सोने जीएसटीसह ७८९०० रु. होते, म्हणजे ८०० रुपयांची वाढ झाली होतीे, तर चांदीच्या भावात किलोला बाराशे रु. वाढ झाली. येणाऱ्या काळात सोने ८५ हजाराचा टप्पा पार करेल, असे मत सराफा व्यावसायिकांतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
मुख्य म्हणजे अमेरिकेतील संभाव्य व्याजदर कपातीची शक्यता आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे व क्रूड ऑईलच्या कमी झालेल्या किंमती यामुळे सोन्याला मागणी वाढत आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ग्राहकांकडून पसंती दिली जातं आहे. यापूर्वी सोने दरातील चढ-उतार ही अल्प काळ होती. आता पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितले जात आहे. यापूर्वी सोन्याचे दर कमी होऊन ७५,५०० रुपये प्रती १० ग्रॅम झाले होते. आता सोने दराने पुन्हा उसळी घेत ७९,००० रुपयांपर्यंत मजल गाठली आहे. त्यामुळे गुरूपुष्यमृत मुहूर्त आणि दिवाळी अशा एकापाठोपाठ येणाऱ्या सणामुळे सोने दरात तेजी बघायला मिळत आहे. आगामी काळात सोन्याची आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे.
----------------------------------------------
दर आणखी वाढतील
सणासुदीच्या काळ असल्याने भविष्यात सोन्याचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता असून सोने ८५००० रुपयांपर्यंत पोहचेल अशी सध्याची परिस्थिती आहे. सोन्याची चढउतार अल्प काळ होती. आता यापुढे दर वाढत राहतील.
चेतन राजापूरकर,
संचालक, राजापुरकर सराफ,
माजी अध्यक्ष सराफ असो. नाशिक
----------------------------------------------
सोने दरात विक्रमी वाढ
सोन्याने ७७००० रुपये प्रति ग्रॅम असे दराचे नवीन शिखर गाठले असून मुख्यत्वे अमेरिकेतील संभाव्य आक्रमक व्याजदर कपातीची अपेक्षा आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या गुंतवणुकीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
मेहुल थोरात
संचालक, में. विश्वनाथ थोरात सराफ, नाशिक. उपाध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन.