नाशिक|आपलाच पिढ्यान पिढ्याचा सोनार राजापूरकर सराफ यांच्या नविन दालनाचा शुभारंभ दि. २४ ऑक्टोबर रोजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होत असून आता ग्राहकांना जवळच सोने, चांदी खरेदीची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनी नव्या दालनाला भेट देऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजापुरकर सराफचे संस्थापक अध्यक्ष चेतन राजापुरकर यांनी केले आहे.
नवीन नावासह आपल्या सोयीच्या ठिकाणी २४ ऑक्टोबर या गुरुपुष्यमृत या शुभमुहूर्तावर आम्ही आपल्या सेवेत येत आहोत पिढ्यानपिढ्यापासून विश्वास आणि गुणवत्ता यासाठी राजापुरकर सराफ प्रसिद्ध असून ग्राहकांसाठी हक्काचे दालन झाले आहे. त्यानिमित्त विविध योजनांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे, असे राजापुरकर यांनी सांगितले आहे.