नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| इगतपुरी-त्र्यबकेश्वर मतदार संघातून गेल्या ३ टर्म पासून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे काँगेसशी एकनिष्ठ असलेल्या आणि राज्यातील १० लाख आदिवासी बांधवांचे पाठबळ असलेल्या लकी जाधव यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्ते, मतदारांकडून पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
लकी जाधव याना तिकीट मिळाल्यास नक्कीच १ लाखाच्या लिडने निवडून येतील असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. तिकीट नाकारल्यास काँग्रेसचा उमेदवार पुन्हा निवडून येईल याची शाश्वती कमी कमी आहे. जाधव यांना तिकीट नाकारल्यास राज्यातील १० लाखाच्या आसपास आदिवासी वोट बँकेला मुकावे लागेल अशी चर्चा आहे. त्यामुळे जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी मतदार संघासह राज्यातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यापाठोपाठ राज्यातही काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, राज्यातही लकी जाधव यांचं संघटन मजबूत असून राज्यातील आदिवासी समाज त्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे जाधव यांना उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहेत.