- २४ ऑक्टोबरला 'राजापूरकर सराफ' दालनाचा अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांच्या हस्ते शुभारंभ - TheAnchor

Breaking

October 20, 2024

२४ ऑक्टोबरला 'राजापूरकर सराफ' दालनाचा अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांच्या हस्ते शुभारंभ

नाशिक|प्रतिनिधी|आपलाच पिढ्यान पिढ्याचा सोनार राजापूरकर सराफ यांच्या नविन दालनाचा शुभारंभ दि. २४ ऑक्टोबर रोजी अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक तक्रार आयोगाचे सेवानिवृत्त न्यायाधिश उदय सोनवणे, जागृत नाशिक जागृत भारत जागृत विश्वचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद, नाशिकचे इतिहास अभ्यासक रमेश पडवळ आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हा उद्घाटन सोहळा २४ ते २६ दरम्यान होणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री सिद्धी संकुल, चांदी गणपती मंदिराच्या मागे, गायधनी गल्ली, नवीन सराफ बाजार, रविवार कारंजा येथे दालन सुरू होणार असून या दालनामुळे ग्राहकांना जवळच सोने, चांदी खरेदीची सुविधा उपलब्ध होणार आहे. महा गुरुपुष्यमृतयोग व उद्घाटन समारंभ निमित्ताने आमच्या खास ग्राहकांसाठी जितके सोन्याचे दागिने तितकी वजनाची चांदी फ्री असून ही योजना फक्त २२ कॅरेट दागिने खरेदीवर उपलब्ध आहे. येथील नव्या दालनाला मोठ्या संख्येने भेट देऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजापूरकर सराफचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी केले आहे.

नवीन नावासह आपल्या सोयीच्या ठिकाणी गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता गुरुपुष्यामृत या शुभमुहूर्तावर आम्ही आपल्या सेवेत येत आहोत. पिढ्यानपिढ्यापासून विश्वास आणि गुणवत्ता यासाठी राजापुरकर सराफ प्रसिद्ध असून ग्राहकांसाठी हक्काचे दालन झाले आहे, असे संस्थापक अध्यक्ष चिंतामण राजापूरकर, अध्यक्ष चेतन राजापूरकर, नंदकिशोर राजापूरकर ,सोहम राजापूरकर, जयेश राजापूरकर व समस्त राजापूरकर परिवारातर्फे सांगण्यात आले आहे.